Sunday, July 1, 2012

कॉम्पुटरवर मराठीत कसे लिहावे

तुमच्या जवळ कॉम्पुटर आणि इंटरनेट सुविधा असेल तर तुमचे लेख , पत्र  मराठीत कसे लिहावे ह्या साठी मी खाली काही सूचना लिहित आहे.
तुम्हाला त्या आवडल्या आणि तुम्ही जास्तीत जास्त मराठीत लिहून मराठी भाषेला अधिक समृद्ध केले तर आजचा रविवारचा वेळ कारणी लागला असे मी समजेन.
१) खालील लिंक वर क्लिक करा किंवा तुमच्या नवीन ब्राउजर विंडो मध्ये कॉपी पेस्ट करा


http://www.google.com/transliterate/marathi


२)मराठी शब्द इंग्रजीत लिहा म्हणजे समजा तुम्हाला "मला" लिहावयाचे असेल तर "mala"  असे लिहा.

computarwar marathit kase lihave
कॉम्पुटरवर  मराठीत  कसे  लिहावे

३) थोडे लिहून झाल्या नंतर तुमच्या स्वतःच्या मुख्य document ( word doc, google doc, email..etc)  मध्ये कॉपी पेस्ट करायला विसरू नका.
हा लेख मी वरील टेक्निक वापरून लिहिला आहे. तुमच्या लेखात इंग्रजी शब्द लिहावयाचे असल्यास पहिल्याच dropdown मेनू कंट्रोल मध्ये Marathi ऐवजी English असा बदल करा.
थोडक्यात एकाच लेखात तुम्ही मराठी, हिंदी,इंग्रजी आणि अन्य भाषा देखील लिहू शकतात.







तुम्ही इमेल साठी जीमेल (gmail) वापरीत असाल तर तुमच्या मातृभाषेत तुम्ही सरळ मेल लिहू शकता. तुमच्या तुमच्या मेलच्या वर "अ" अक्षर दिसेल ते फक्त एकदा click करा. तुम्ही सरळ मराठीत मेल लिहू शकतात काही शब्द इग्रजीत हवे असतील तर तेच "अ" बटन परत दाबा.




तुमच्या मेल वर "अ" अक्षर नसेल तर खालील चित्रात दाखविल्या प्रमाणे भाषा निवडण्यासाठी बटन असेल ते वापरा.


तुम्ही तुम्हाला हवी ती भाषा मेल लिहिण्यासाठी सेट करू शकतात




बस इतके सोपे आहे. मराठीत लिहा मराठीचा अभिमान बाळगा पण हे सोपे करण्या साठी इग्रजीची मदत घ्यावी लागते हेही विसरू नका.तुमच्या मातृभाषे व्यतिरिक्त अन्य एखादी भाषा  माहित असणे हि काळाची गरज आहे.


                                                                                 -संजीव चौधरी

No comments:

Post a Comment